‘ती’चा सहभाग वाढो
जिच्या हाती पाळण्याची दोरी | तीच जगाते उद्धारी | ऐसी वर्णिली मातेची थोरी | शेकडो गुरुहुनिही|| राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्त्रीचे, पर्यायाने आईचे केलेले हे वर्णन. एकेकाळी कुटुंबापुरती मर्यादित असलेली स्त्रीची हुशारी, निर्णयक्षमता, धडाडी, संधी मिळाली तर ती स्त्री त्या संधीचे नक्कीच सोने करू शकते. इतिहासाचा आढावा घेतला तर राजमाता जिजाऊपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी …